मुरुम / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त मंच, जिल्हा उस्मानाबादच्या   जिल्हाध्यक्षपदी कमलाकर मोटे, कार्याध्यक्ष सुभाष वैरागकर (उमरगा) तर सरचिटणीस दिलीप चौधरी (वाशी) यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. 

या कार्यकारिणात पुढील प्रमाणे मार्गदर्शक डाॅ.बालाजी इंगळे (माडज), समाधान शिकेतोड (डायट, उस्मानाबाद), उपाध्यक्ष सुनिल पुजारी (नळदुर्ग), कोषाध्यक्ष नुरमहमद घाटवाले (मुरुम), चिटणीस लक्ष्मण चव्हाण (धानुरी), महिला प्रतिनिधी रंजना स्वामी (तुळजापूर), प्रसिध्दी प्रमुख कुंडलिक पवार (उस्मानाबाद), पदाधिकारी सरीता उपासे (उमरगा), शेहनाजबानु औसेकर (बेंबळी) यांची सोमवारी (ता.२६) रोजी झुमद्वारे आयोजित मिटींगमध्ये सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. मंचच्या माध्यमातून विद्यार्थी गुणवत्ता विकास, शाळांचे सुशोभिकरण, समाजोपयोगी उपक्रम राबविणे, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न शासन दरबारी न्याय व सनदशीर मार्गाने सोडवून घेणे. यासाठी भविष्यात मंच प्रयत्नशील राहणार असल्याचे मत नुतन पदाधिकारींनी व्यक्त केले. यांच्या निवडीबद्दल सर्वत्र शिक्षक बांधवांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

 
Top