तामलवाडी / प्रतिनिधी- 

तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथे शेत जमिनीच्या वादातुन एका 52 वर्षीय इसमावर तीक्ष्ण विळ्याने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पांगरदरवाडी येथील सत्यवान गोपिनाथ शिंदे वय (52) हे आपल्या शेतात ऊसाच्या कडेला बांधावर म्हैस चारत असताना भावकीतील किरण गहिणीनाथ शिंदे याने तुम्हाला सामाईक जमिन कशी काय जास्त वाटून आली. तुम्ही त्या जमिनीवर कसे काय पिक घेता म्हणत शिविगाळ करत तु त्या जमिनीवर पिक घेतले तर तुला जिवे मारतो म्हणत तीक्ष्ण विळ्याने हातावर,छातीवर वार करुन गंभीर जखमी केले. सत्यवान गोपिनाथ शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी  किरण शिंदे याच्या विरूद्ध तामलवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बीट अंमलदार गोरोबा गाढवे हे करित आहेत.  


 
Top