उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे मंदिर ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्र असून देशभरातून लाखों भाविक दरमहा दर्शनासाठी येत असतात. नवरात्र व कोजागिरी पौर्णिमेला येथे मोठे उत्सव व धार्मिक कार्यक्रम असतात. येथे अनेक पुरातन मंदिरे असून इतिहासाची साक्ष देणाऱ्या आहेत. त्यामुळे आई जगदंबेच्या वास्तव्याने पावन झालेल्या श्री क्षेत्र तुळजापूरचा वैश्विक पर्यटन केंद्र म्हणून विकास करण्यासाठी व या माध्यमातून या भागाच्या अर्थकारणाला चालना देण्यासाठी आई तुळजाभवानी तीर्थक्षेत्राचा केंद्र शासनाच्या  पर्यटन मंत्रालय अंतर्गत प्रशाद  योजनेमध्ये समावेश करावा यासाठी केंद्र सरकारला शिफारशीसह विनंती करणे बाबत सर्व संबंधितांची बैठक बोलवावी, अशी मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी राज्याचे पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे.

   श्री क्षेत्र तुळजापूरचा या योजने मध्ये समावेश केल्यास या भागात मोठी गुंतवणूक वाढेल व औद्योगिकीकरणाचा अभाव असलेल्या या जिल्ह्यात मोठी आर्थिक क्रांती घडणार आहे. त्यामुळे केंद्र शासन, राज्य शासन व CSR च्या माध्यमातून जिल्ह्यातील ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक व पर्यटन स्थळांचा विकास केल्यास जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक व दरडोई उत्पन्नात मोठी भर पडू शकते. केंद्र सरकार देखील याबाबत सकारात्मक आहे.  

 त्यामुळे आई तुळजाभवानी तीर्थक्षेत्राचा प्रशाद   योजनेमध्ये समावेश करण्यासाठी केंद्र सरकारला शिफारशीसह विनंती करणे बाबत सर्व संबंधितांची बैठक बोलवावी, अशी मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी राज्याचे पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे.


 
Top