उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 भारतीय स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकास पीक कर्ज 3 लक्ष रु.पर्यंत मंजुरी अधिकार देणे व बँकेतील रिक्त पदे भरण्यासंदर्भात उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी देशाचे अर्थ राज्यमंत्री  डॉ. भागवतजी कराड  यांची मंत्री महोदयांच्या  नवी दिल्ली येथिल मंत्रालय दालनात भेट घेऊन मागणी केली.

 उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ क्षेत्रात तसेच महाराष्ट्र राज्यात भारतीय स्टेट बँकेच्या अनेक शाखा ग्राहकांच्या सेवेत प्रामाणिकपणे कार्यरत आहेत. परंतु आरएसीसीकडे जिल्ह्यातील विविध शाखांमधील कर्जाच्या संदर्भात कर्जाची प्रकरणे प्रस्तावित आहेत, ज्यामुळे पीक कर्जाची कामे करण्यास 6 ते 12 महिने लागतात, त्यामुळे शेतकरी व बँक कर्मचार्‍यांना बरेच दिवस प्रक्रिया आणि मंजुरी होईपर्यंत थांबावे लागते. या सर्व बँकांच्या शाखा व्यवस्थापकास पीक कर्ज वितरण करण्यास परवानगी नसल्याने व बँकेतील कर्मचारी रिक्त पदे असल्याने पीक कर्ज वाटपास बरेच दिवस विलंब लागत आहे. हे अर्थ राज्यमंत्री यांच्या निदर्श्नास आणून दिले. 


 
Top