परंडा / प्रतिनिधी :-

परंडा तालुक्यातील अनाळा येथे कनिष्क भारत गॅस ग्रामिण वितरक परंडा यांच्या वतीने भारत गॅस पॉईन्टचे उद्घाटन दि. २३ रोजी कनिष्क भारत गॅसचे संचालक राजेंद्रजी निकाळजे व सरपंच जोतीराम क्षिरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी कनिष्क भारत गॅसचे राजेंद्र जी निकाळजे यांनी गॅस हातळताना घ्यावयाची काळजी, गॅसचा वापर याविषयी अनमोल मार्गदर्शन केले. कनिष्क भारत गॅसचे कर्मचारी अमजद मुजावर यांनी गॅसचा वापर करताना अचानक पेट घेणे, स्वयंपाक झाल्यानंतर सिंलेडरचे बटन बंद करणे, गॅस टाकीतला गॅस संपला आहे का ? याची तपासणी कशी करणे, सिलेडर मधील गॅस घरात लिक झाल्यास सर्वप्रथम काय करावयाचे यांचे प्रात्यक्षिक महिलांना सादर केले. अनाळा येथील भारत गॅस पॉईन्ट मुळे ग्राहकांना वेळेवर सिलेंडर तसेच नविन गॅस कनेक्शन  मिळणार आहे.

कार्यक्रमास उपसरपंच दादासाहेब फराटे, ग्रा.प. सदस्य अजित शिंदे, आरपीआय चे तालुका संपर्क प्रमुख दादासाहेब सरवदे, प्राध्यापक डॉ. प्रकाश सरवदे, पत्रकार निशिकांत क्षिरसागर, सतिश चोबे, साजीद शेख,बचत गटाच्या प्रेरिका नौशाद शेख, रेणुका सुर्वे, राणी रेवडे, नसरीन शेख ,शबनम शेख , अंबिका क्षिरसागर, अनिता क्षिरसागर, वनमाला क्षिरसागर यांच्यासह  बचत गटाच्या महिला कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमजद मुजावर यांनी केले तर आभार भारत गॅस पॉइन्टचे चालक अलिम शेख यांनी मानले.

 
Top