तुळजापूर / प्रतिनिधी-

आमचा आग्रह तिन्ही पक्ष एकञित लढण्याचा असुन काँग्रेसला स्वबळावर लढायाचे असेल तर आम्ही व शिवसेना ऐकञ लढु , अशी माहिती  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंञी जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादी परिवार संवाद याञेच्या शुभारंभ नंतर पञकारांशी बोलताना दिली. यावेळी मंञी धनजय मुंढे संजय बनसोडे रुपाली चाकणकर आदी मान्यवर उपस्थितीत होते.

यावेळी पञकारांशी बोलताना  पाटील पुढे म्हणाले की, कोरोना लाँकडाऊन मुळे.अडचणीत आलेल्या घटकांना  जगण्याची नवी उमेद निर्माण करण्याचा आशिर्वाद आई भवानीने द्यावा, पावसाळा महाराष्ट्राचा समाधान करणारा जावा व पुर परिस्थिती येवु नये, असे साकडे आपण देविला घातले आहे, सोशल डिस्टंस पाळुन फक्त पदाधिकारींना बोलवुन त्यांच्याकडुन आम्ही त्या भागातील मतदार संघाचा राजकिय  व विकास कामासाठी काय करावे लागणार याचा आढावा घेत असे ते  म्हणाले. आ. सरनाईक पञाबाबतीत बोलताना पाटील म्हणाले की, पञातील भाषा ञास दिली जाणारी आहे. केंद्र  ईडी इन्कमटँक्स या दोन ऐजेन्सीचा वापर राजकिय दबाव आणण्यासाठी, ञास देण्यासाठी केला जातो हे आ. सरनाईकांच्या पञाने अधोरेखीत होते, असे यावेळी म्हणाले .

 काँग्रेस स्वबळावर लढण्याबाबतीत बोलताना पाटील म्हणाले की, आमचा आग्रह  तिन्ही पक्ष एकञित पणे लढणे हा असेल त्यांनी  आमच्या सोबत राहावे असा आमचा प्रयत्न असेल त्यांना जर स्वबळावर लढायाचे असेल तर आम्ही व शिवसेना एकञ लढु, असे यावेळी स्पष्ट केले. 

मराठवाडा वाँटर ग्रीड 

मराठवाडाला कृष्णा खोरेचे वैन गंगा पासुन  नळगंगा पर्यत जाणाऱ्या पाण्यातील काही पाणी नाशीकसह परिसरातील वळण बंधा-यातील पाणी देवुन मराठवाड्याचा पाण्याची तुट कमी करुन भरुन काढण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, यास मुखमंञी उध्दव ठाकरे, उपमुखमंञी अजित पवार यांचा ही पाठींबा असल्याचे यावेळी म्हणाले. पक्ष संघटना मजबुत करणे, आमचे लक्ष आहे, आम्ही बेरजेच्या  राजकारणाला प्राधान्य देण्याचा मताचे आहोत.राष्ट्रवादी काँग्रेस सोडुन गेलेल्यांना  आपल्या घरट्यात परत येण्याची इछा असेल तर स्थानिक पातळीवरील मत घेवुन त्यावर निर्णय घेणार असल्याचे यावेळी  जयंत पाटील यांनी सांगितले.  

 
Top