कळंब / प्रतिनिधी-

शहरात पहाटे गोळ्या झाडून खून झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ऐन शहराच्या मध्यवर्ती भागात खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. 

शहरातील मार्केट यार्डमध्ये जाधव यांची आडत आहे. तेथे पाच ते सहा हमाल काम करतात. त्यापैकी मचिंद्र माने अंदाजे वय 50 (राहणार डिकसळ) हा हमालीसोबत जाधव यांच्या अडतीवर वॉचमन म्हणून देखील काम करत होता. दरम्यान जाधव यांच्या आडतीच्या बाहेरच्या परिसरात माने झोपला होता.

अचानक एकजण भिंतीवरून उडी मारून आला आणि त्याने मानेला मारहाण करायला सुरुवात केली. दोघांमध्ये झटापटी झाली आणि आणि नंतर माने खाली पडले. सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार पाहणाऱ्या मालक सांगतायत झटापटीत स्पार्क झाल्याचं दिसतं त्यानंतर माने खाली पडले. त्यामुळे माने यांना घावटी पिस्तुलने गोळ्या झाडल्याची शक्यता वर्तवली जातेय.

ही घटना घडल्याचं कळताच जाधव यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. शहरात खून झाल्याने तात्काळ अडिशनल एस.पी संदीप पालवे यांनी घटनास्थळी पोहोचून परिसरात लोकांकडून आणि आडत मालकांकडून माहिती घेतली. तसेच लागलीच श्वान पथक देखील घटनास्थळी दाखल झाला होता. मचिंद्र माने यांच्या वैक्तिक कारणामुळे त्यांचा खून झाला की मारेकरी दरोड्याच्या हेतूने आले होते की अन्य कारणामुळे याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

सदर मयताच्या छातीवर गंभिर जखम आहे. ही जखम नेमकी कोणत्या हत्याराची आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र सकाळपासून शहरात गोळ्या झाडून खून झाल्याची जोरदार चर्चाआहे.

 
Top