मुरूम/ प्रतिनिधी-

 उमरगा तालुक्यातील मुरूम कोविड केअर सेंटरला स्मशानभूमी स्वच्छता समितीकडून कोरोना बाधित रुग्णांना अंडी, दूध वाटप शुक्रवारी (ता.४) रोजी करण्यात आले. कोरोना  काळात डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी योगदान दिल्याबद्ल त्यांचा सत्कार  करण्यात आला. 

या कोविड केअर मध्ये सध्या ५० पेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असल्याने व्हिटॅमिन डी, ए, बी १२ आणि सेलेनियमचा स्त्रोत वाढण्यास मदत होते. या हेतूने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अंडी, दुध स्मशानभूमी स्वच्छता कमिटीकडून देण्यात आले. सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. अशा वेळी ग्रामीण भागातील रुग्णांना तत्पर वैद्यकीय उपचार करत असल्याबद्ल डॉ. एम.जी.मुल्ला, कर्मचारी प्रसन्न कांबळे, अजीज चौधरी, घंटे पुनम यांनी काम केल्याबद्ल त्यांचाही सत्कार स्मशानभूमी स्वच्छता समितीचे सदस्य तथा नगरसेवक सिद्धलिंग स्वामी, भारतीय माजी सैनिक संघटनेचे जिल्हा सचिव विजयकुमार हिरेमठ, शरणाप्पा धुम्मा, श्रीशैल मंगरुळे, शिवपुत्र सोलापूरे, संतोष चटगे, देवराज संगुळगे, किरण गायकवाड आदींच्या उपस्थितीत सत्कार पार पडला. यावेळी वीरभद्र मोरखंडे, गुंडप्पा पुराणे, अजित राजपूत, दयानंद स्वामी, संगमेश्वर करके, रमेश पुराणे आदींनी पुढाकार घेतला.

 
Top