नळदुर्ग / प्रतिनिधी-

जागतीक पर्यावरण दिनानिमित्त नळदुर्ग येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी मध्यवर्ती जन्मोत्सव समिती व शहर मनसेच्या वतीने वृक्ष लागवड करण्यात आली.त्याचबरोबर नळदुर्ग बसस्थानकातही वृक्ष लागवड करण्यात आली. दि.५ जुन रोजी जागतीक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. सध्या पर्यावरण समतोल राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. पर्यावरण टिकले तरच भविष्य आहे अन्यथा मोठी हानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनासह इतर संघटनांकडुन वृक्ष लागवड केली जात आहे. 

नळदुर्ग येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जन्मोत्सव समिती तसेच बसस्थानकात वाहतुक नियंत्रक महेश डुकरे व ज्योतिराम दस यांनी वृक्ष लागवड करून त्यांचे मोठ्याप्रमाणात जतन केले आहे. दि.५ जुन रोजी जागतीक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जन्मोत्सव समितीच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यालगत वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी समितीचे पद्माकर घोडके,विलास येडगे, अमर भाळे,शहर भाजयुमोचे अध्यक्ष श्रमिक पोतदार, सामाजिक कार्यकर्ते मारुती खारवे, संजय विठ्ठल जाधव, समीर बाडेवाले,माजी नगरसेवक सुधीर हजारे,पत्रकार उत्तम बनजगोळे आदीजन उपस्थित होते. नळदुर्ग बसस्थानकात वाहतुक नियंत्रक महेश डुकरे, चालक संभाजी महाबोले व देडे यांनी वृक्ष लागवड केली. नळदुर्ग शहर मनसेच्या वतीने येथील धारित्री प्राथमिक विद्यामंदिर परीसरात वृक्ष लागवड करण्यात आली. याठिकाणी मनसेचे शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी व अनिल गुरव यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली.

 
Top