तुळजापूर / प्रतिनिधी

जिल्हा बंजारा समाजाच्या वतीने ओबीसी आरक्षण पूर्ववत करण्यात यावे तसेच नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळास माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे  या मागण्याचे निवेदन बंजारा समाजाच्या वतीने देण्यात आले. 

ओबीसी समाजाचे 27 टक्के राजकीय आरक्षण केंद्र सरकारने लोकसंख्येची माहिती न दिल्याने सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द केले आहे ते आरक्षण पूर्ववत करण्यात यावे तसेच नवी मुंबईच्या निर्मितीसाठी व सिडको स्थापन करण्यासाठी मोलाचे योगदान असलेले हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री क.ै वसंतराव नाईक यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास देण्यात यावे, ही मागणी  जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आली.

यावेळी विमुक्त भटक्या जाती- जमातीचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, शिवसेना ज्येष्ठ नेते गुलाब जाधव , राष्ट्रीय बंजारा परिषदेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण चव्हाण,ओबीसी सेलचे शहराध्यक्ष वैभव जाधव, बाजार समितीचे माजी संचालक हरीष जाधव, डॉ सुरज चव्हाण,  गोर सेनेचे तालुकाध्यक्ष राजु चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष लखन चव्हाण, जिल्हा सचिव कुमार राठोड ,लक्ष्मण राठोड, बालाजी राठोड भीमराव राठोड ,संतोष चव्हाण ,वसंत पवार गोविंद राठोड ,दिनेश राठोड सचिन राठोड ,शिवाजी चव्हाण ,विनायक राठोड  आदीसह बंजारा कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top