तुळजापूर / प्रतिनिधी

 तिर्थक्षेञ तुळजापूरात  वयोवृध्द -ज्येष्ठ नागरिकांना  स्वच्छ ऑक्सिजन मिळण्यासाठी निसर्गाने व्यापलेला मोठा बगीचा नाना-नानी  पार्क तयार  करण्याची मागणी भष्ट्राचार विरोधी जनआंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष अँड धिरज जाधव यांनी नगरपरिषदला निवेदन देवुन केली आहे. 

महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजाभवानी दर्शनार्थ देशातुन भाविक येतात त्यात जेष्ट मंडळीचा समावेशअसतो सध्या  कोरोना प्रादुर्भाव संपुष्टात येत नाही,भविष्यात ही याचा संभाव्य धोका असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे वयोवृध्द -ज्येष्ठ नागरीक व लहान बालकांना अधिक प्रमाणात धोका होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर  नगर परिषद प्रशासनाने याची वेळीच दखल घेवून तुळजापूर शहरातील वयोवृध्द -ज्येष्ठ नागरिकांना स्वच्छ ऑक्सिजन मिळण्यासाठी निसर्गाने व्यापलेला भव्य असा  ऑक्सिजनपूरक वृक्ष लावुन  निसर्गरम्य बगीचा उभारावा, सदर निसर्गरम्य बगीचामध्ये ऑक्सिजनपूरक झाडे लावावीत , जेणेकरुन तुळजापूर शहरातील नागरिकांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल, सध्या संपूर्ण जगासह भारतामध्ये महामारी कोरोना या संसर्गजन्य विषाणुचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालेले दिसत आहे. या विषाणुचा प्रादुर्भाव झालेली व्यक्ती ऑक्सिजन मिळत नसल्या कारणाने मागील काही दिवसांमध्ये मृत्यू झाल्याचे वृत्तवाहिनीमध्ये पहावयास मिळालेले आहे . अशापध्दतीचे पुढील काळात नवनवीन आजार जन्माला येत आहेत, जसे की   म्युकरमायसिस ब्लँक कंगस डेल्टा यास रोखण्यासाठी  वेळी उपाय-योजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. 


 
Top