उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पूर्वसूचना न देता तसेच दिवसांतून असंख्य वेळा वीज पुरवठा खंडित होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याची ओरड अनेक माध्यमातून होऊनही अद्याप महावितरणने याबाबत दखल घेतली नसल्याचा प्रत्यय आज मंगळवार ८ जून रोजी पुन्हा एकदा आला. मंगळवार ८ जूनच्या  सकाळपासूनच वीज गायब झाल्याने इन्व्हर्टरचा बॅकअप ही संपला असल्यामुळे  बहुतांश ठिकाणी कामकाज ठप्प झाले होते. पाऊस पडून गेल्याने आद्रता वाढली असून पंखे ,वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याने नागरिकांच्या अंगातून घामाच्या धारा वाहात होत्या.त्यामुळेच महावितरणचा पुन्हा ‘हम नहीं सुधरेंगे कारभार’ याचा प्रत्यक्ष पुन्हा दिसून आला. 

महावितरणचा वीज बंदचा हक्काचा मंगळवार असला तरी ग्राहकांना पूर्वसूचना न देणे तसेच दररोज  वीज गायब होणे हे नित्याचेच झाले असल्याने आता याबाबत महावितरणलाच झटका द्यायची वेळ आली आहे.विशेष म्हणजे आज वादळी वारे किंवा पाऊस हि नव्हता जेणे करुन लाईट बंद करायला महावितरणच्या या मनमानी कारभारावर नागरिकातून संताप व्यक्त होत आहे.

ग्रामीण भागातील लाईट गुल

उस्मानाबाद शहरासह ग्रामीण भागात ही वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना, व्यापाऱ्यांना उखाड्याचा त्रास सहन करावा लागला. ग्रामीण भागात दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर नागरिकांना थोड्यातफार प्रमाणात दिलासा मिळाला. 

 -----------------------------------------------------------

नुकतेच लॉकडाऊन ॲनलॉक झाल्यामुळे व्यापारी सकाळीच दुकाने उघडुन बसले होते लाईट गेल्यामुळे अनेक समस्याना समोरे जावे लागले तर झेरॉक्स टायपींग दुकानदाराना  समोर ग्राहक  आले असतानाही हातावरहात ठेउन बसावे लागले. अखेर उस्मानाबाद शहरात दुपारी पावणे एकवाजता लाईट आल्यामुळे आज थोडा फार तरी धंदा होईल या आशेवर दुकाने सुरु झाले कारण 4 वाजता दुकाने बंद करण्याची वेळ असल्यामुळे धावपळीतच धंदा करावा लागला.

 मुकेश कोळेकर-झेरॉक्स व टायपींग दुकानदार


 
Top