कळंब / प्रतिनिधी-

 एम.सी.एल अंतर्गत  नॅचरल फारमर प्रोडक्ट कंपनी  ही कळंब तालुक्यात  शेतीतील टाकाऊ कचरा पासून बायो, सीएनजी, गॅस उत्पादन करणार आहे.

देशात डिझेल व पेट्रोलचे दर दिवसेंदिवस गगणाला भिडत आहेत. त्याला पर्याय म्हणून गॅस उत्पादन चालु केले जात आहे. व यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे.अशा प्रकारच्या प्रोजेक्टमुळे शेतकाऱ्यांचा शाश्वत विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतकऱ्यांकडे टाकाऊ कचरा 12 महीने उपलब्ध होऊ शकत नाही त्यामुळे सुपर नेपीअर/ हत्ती गवत याची लागवड करावी लागणार आहे.हे आपणास बारा महीने उपलब्ध होऊ शकते. या गवताचे उत्पन्न प्रती एकर सरासरी 40 ते 45 टन एवढे आहे प्रत्येक 3 महीण्यात याची कापणी केली जाणार आहे. याची कापणीचा व वाहतूकीचा खर्च कंपनीचा असणार आहे.आता  सोयाबीन , हरभरा, गहू, कडबा, ज्वारी , यांचे भुसकट सुध्दा शेतकऱ्यांत कडुन विकत घेतले जाणार आहे म्हणजेच प्रती एकर प्रती वर्ष उत्पन्न 40टन 4 = 160 टन भाव प्रती टन रु 1000 म्हणजेच  प्रती वर्ष प्रती एकर उत्पन्न 1,60,000 रूपये सरासरी 7 वर्ष खोडवा चालतो.

तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकर्यांनी या कंपनी चा लाभ घाला असे अहवान महाराज धुमाळ यांनी केले तसेच इतर काही अडचणी असल्यास  8605678515 या नंबर वर संपर्क करावेत


 
Top