उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्ह्यात 9 व 10 जुनला 11 लसीकरण केंद्रावर ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस दिला जाणार आहे , 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना ही लस दिली जाणार असुन बुधवारी 9 जुनला 3120 डोस तर गुरुवारी 3120 असे एकूण 6 हजार 240 डोस दिले जाणार आहेत. 6 ग्रामीण रुग्णालय , 4 उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा शासकीय रुग्णालय येथे हे लसीकरण होणार असून जे नागरिक सुरुवातीला येतील त्यांना प्राधान्य क्रमाने टोकन देऊन लस दिली जाणार आहे. या लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची गरज नाही.

ज्या 18 ते 45 वयोगटातील नागरिकांनी ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला डोस 10 मे किंवा 11 मे रोजी घेतला होता केवळ अश्याच लाभार्थीना 9 व 10 जुन रोजी लस दिली जाणार आहे त्यामुळे इतर नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहन जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ कुलदीप मिटकरी यांनी केले आहे. लसीकरणला येताना आधार कार्ड व पहिल्यांदा दिलेल्या डोसचे प्रमाणपत्र सोबत असणे बंधनकारक आहे.

ग्रामीण रुग्णालय तेर येथे 230 डोस, सास्तुर येथे 240, ग्रामीण रुग्णालय लोहारा व तेर वाशी आणि भूम या 4 ठिकाणी प्रत्येकी 250 डोस दिले जाणार आहेत तर उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर , उमरगा , कळंब व परंडा या 4 ठिकाणी प्रत्येकी 300 तर उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालय येथे 450 डोस दिले जाणार आहेत. 9 व 10 जुनला हे लसीकरण होणार आहे त्यामुळे केवळ पात्र नागरिकांनीच लसीकरणला यावे जेणेकरून गर्दी होणार नाही. 10 व 11 मे रोजी पहिला डोस घेतलेल्या सर्वांसाठी लस राखुन ठेवली आहे त्यामुळे ती सर्वांना मिळणार आहे त्यामुळे एकाच वेळी लसीकरण केंद्रात गर्दी करू नये, असे आवाहन डॉ मेटकरी यांनी केले आहे.

 
Top