उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जागतिक योग दिनानिमीत्त जिल्हा भाजपाच्या वतीने भाजपा युवा मोर्चा च्या पुढाकाराने जिल्हाभरात असंख्य ठिकाणी सोमवार दि. २१ रोजी योग शिबीरे घेऊन योगदिन साजरा करण्यात आला.  योगादिनांच्या पार्श्वभुमीवर उस्मानाबाद शहरात सुध्दा योग शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा कार्यालय प्रतिष्ठाण भवन उस्मानाबाद येथे आयोजित योग शिबीरास बालयोगी वरद संतोष जोशी यांनी योग प्रशिक्षण दिले. तसेच प्रत्येक योग शिकवत असतांना योग केल्याने शरिरास होणारे फायदे सांगण्यात आले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण देशासह जगभरात योग दिना निमीत्त योग शिबीरे आयोजित करण्यात आली होती. त्या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्ह्यात,भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकुर व आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या सुचनेनुसार धाराशिव जिल्हयात असंख्य ठिकाणी योग दिनानिमीत्त योग शिबीरे घेऊन योगादिन मोठया प्रमाणात साजरा करण्यात आला. उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व मंडळामध्ये या योग शिबीरामध्ये असंख्य महिला व पुरुषांनी सहभाग नोंदवला, तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजमुयो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, उपनगराध्यक्ष अभय इंगळे,शहराध्यक्ष राहुल काकडे, नगरसेवक दाजीप्पा पवार, तसेच शहरातील, संदीप इंगळे,प्रीतम मुंडे, विशाल पाटील, खंडु राऊत, या सर्वानी योग शिबीरास सहभाग नोंदवला.

 
Top