उस्मानाबाद / प्रतिनिधी-

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण  कायम ठेवावे या मागणीसाठी ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीने उस्मानाबाद येथे सोमवार दि. २१ रोजी रस्ता रोको करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

प्रशासकीय पदोन्नती मध्ये आरक्षण कायम ठेवावे व ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली न्यायालयाच्या निकालामुळे ओबीसीचे राजकिय आरक्षण रद्ध झाले असुन ते पुन्हा द्यावे व तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेऊ नये, जातीनिहाय जनगनना करावी , नौकरीतील पदोन्नती आरक्षण कायम ठेवावे  या मागणीसाठी समता परिषदेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग क्र 52 वर रास्तारोको आंदोलन करण्यात आले . यावेळी पोलीसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता .आंदोलनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली .

आंदोलनात जिलाध्यक्ष महादेव माळी, जिल्हा उपाध्यक्ष बिभीषण खुने , समता परिषद प्रदेश चिटणीस आबासाहेब खोत , परांडा तालुकाध्यक्ष नंदू शिंदे , भूम तालुकाध्यक्ष संतोष डोरले , प्रा राजेन्द्र खडबडे कळंब तालुकाध्यक्ष , तुळजापूर तालुकाध्यक्ष दत्ता कांबळे , ओबीसी राजकीय आरक्षण बचाव समिती जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने , बहुजन योद्धा सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय शिंगाडे ,  तेली समाज युवक प्रदेशाध्यक्ष रवी कोरे आळणीकर , ओबीसी प्रदेश कार्यकारिणी सदस्य सचिन चौधरी, जिवा सेना जिल्हाध्यक्ष नामदेव वाघमारे व इतर सर्व ओबीसी संघटनाचे पदाधिकाऱ्यांनी मोठ्या भाग घेतला होता. 

 
Top