उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त लोकमान्य टिळक गणेश मंडळ महाजन गल्ली जुने राम मंदिर जवळ उस्मानाबाद यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.याप्रसंगी  30 रक्तदात्यानी रक्तदान केले ,त्या सर्व रक्तदात्यांचे आभार व 20 जणांचे रक्तदान करण्यासाठी  नाव नोंदणी करण्यात आले.

 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून शिबिराचे उद्घाटन लोकनेते आमदार राणाजगजितसिंह पाटिल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपा बुद्धीजिवी प्रकोष्ठ दत्ताभाऊ कुलकर्णी, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, युवा नेते सूरज शेरकर, नागेश जगदाळे, तेजस कुलकर्णी, मल्हारी हवालदार, विशाल पाटील, प्रसाद मुंडे, ओंकार शेरकर व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top