उस्मानाबाद / प्रतिनिधी-

ऑल इंडिया युनानी मेडिकल काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र -1 वैराग रोड उस्मानाबाद येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. शकील अहमद खान यांची निवड झाली आहे.

संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. सय्यद अहमद खान यांच्या मार्गदर्शनानुसार संघटनेचे राष्ट्रीय संयोजक तथा प्रशासक डॉ. एस. एम. हुसेन यांनी ही निवड केल्याचे जाहीर केले आहे.  जून 2021 पासून मे 2023 पर्यंत ही निवड कायम राहणार आहे. ऑल इंडिया युनानी मेडिकल काँगेस, नवी दिल्ली या संस्थेचे डॉ. खान हे महाराष्ट्रातील सक्रिय पदाधिकारी आहेत. यापूर्वी संघटनेेचे महाराष्ट्र प्रदेश वैद्यकीय अधिकारी विंगचे अध्यक्ष म्हणून म्हणून काम पाहिलेले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन  ही निवड करण्यात आली आहे. गतवर्षीच संघटनेच्या वतीने राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आलेले होते.


 
Top