मुरुम / प्रतिनिधी

 कंटेकूर, ता.उमरगा येथे श्री प्रतिप्रसाद बहुद्देशीय सामाजिक संस्था, लातूरच्या वतीने मंगळवारी (ता.२९) रोजी ग्रामपंचायत सदस्या अनिता स्वामी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राम मुडगे, प्रगतशील शेतकरी विनायक शिंदे, अंगणवाडीसेविका ज्योती बादणे, आशा स्वंयसेविका मंगल शेवाळे, लक्ष्मी घोडके, बचत गटाच्या रुक्मीण जमादार, शिक्षक विठ्ठल कुलकर्णी, संध्या कलशेट्टी, बबिता निंबाळकर, संस्थेचे कमलाकर मोटे यांच्या हस्ते झाडांच्या विविध जातीच्या रोपांचे रोपण करण्यात आले.

 या प्रसंगी वृक्षसंवर्धनाचे महत्व खऱ्या अर्थाने कोरोना संकट काळात कळाल्याचे विठ्ठल कुलकर्णी यांनी उपस्थितांना सांगितले.  

 
Top