तुळजापूर/ प्रतिनिधी-

तालुक्यातील स्मार्ट ग्रामपंचायत आलियाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्षा तथा जिल्हा परिषद सदस्या सक्षणा सलगर यांनी दौरा केला. यावेळी  ा ग्रामपंचायत अंतर्गत केलेल्या नाविन्यपूर्ण विकास कामांची सक्षणा सलगर  पाहणी केली.व गाव अतंर्गत झालेल्या कामाचे समाधान व्यक्त करुन विकास कामांसाठी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच ज्योतीका चव्हाण, पोलीस पाटील शिवाजी चव्हाण, माजी सरपंच सुभाष नाईक, ग्रामपंचायत सदस्या घमाबाई राठोड, पांडुरंग चव्हाण ,थावरू राठोड, संदीप राठोड, राजकुमार पवार, आदींची उपस्थिती होती.  

 
Top