तुळजापूर/ प्रतिनिधी-

 नगरपरिषदची  बुधवार दि२४ रोजी झालेली  सर्वसाधारण सभा खेळीमेळीचा वातावरणात पार पडली. यावेळी १० प्रभागातील  विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली. नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सर्वसाधारण सभेस २०  पैकी १२ नगरसेवक उपस्थितीत होते.

या सर्वसाधारण सभेत प्रभाग क्रमांक १ ते १० मधील विविध विकास कामांना मान्यता मिळाली.दिव्यांग पाच  टक्के निधी वापर  करणे पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल अनुदान वितरीत करणे तुळजापूरविकासप्राधिकरण अंतर्गत झालेल्या रस्ता रोडफर्निचर काम करणे यास मान्यता देण्यात आली तसेच प्रारुप विकास योजना (  वाढीव हद्द) यायोजनेत अर्जदार संस्थेच्या जागेवर ठेवण्यात आलेल्या आरक्षण क्रमांक ४४ व ४५ वगळून उर्वरीत सदर जमिन रहिवासी समाविष्ट करणे याविषयावर चर्चा होवुन पर्यायी जागा उपलब्ध झाल्यानंतर यावर निर्णय घेण्याचे ठरले.माजीसैनिक व सैनिक विधवा यांना मालमत्ता करातुन वगळण्याचा ठराव पास करण्यात आला.उस्मानाबाद रोडलगत गौरी लाँज पाठीमागे  मलबा सोसायटी परिसरात रस्ता नाली पाईप लाईन विविध विकास कामे करणे बाबत ठराव मंजुर झाल.

 
Top