उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महाराषट्र शासनाच्या परीपञकानुसार ६जुन रोजी ,सकाळी११ वाजता प्रथम “शिवस्वराज्य दिन”साजरा करण्यात आला.यावेळी छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांचे हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरवात “महाराष्ट्र गीताने करण्यात आली.

प्राचार्य जयसिंगराव देशमुख मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की,”छञपती शिवरायांचे कार्य आपणास माहित आहेच. त्यांनी त्यावेळी अनेक कल्याणकारी योजना जनतेसाठी राबवल्या आणि स्वराज्य निर्माण केले आज त्यांचा आदर्श घेऊन कार्य केले तर सर्व घटक सूखाने नांदेल.आज प्रथम “शिवस्वराज्य दिन”साजरा करतांना आपण याचे साक्षीदार आहोत याचे समाधान आपणास मिळत आहे.सध्या कोरोनाची परिस्थिती असल्याने आपण मर्यादित स्वरापात हा दिन साजरा करत आहोत.”

यावेळी प्रा.डाॅ.शांतीनाथ घोडके,श्री व सौ प्रा.डाॅ.महाडीक,प्रा.डाॅ.केशव क्षीरसागर,प्रा.माधव उगीले,प्रा.राजा जगताप,प्रा.डाॅ.विकास सरनाईक,प्रा.मंगेश भोसले ,नागा देशमुख,व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व सेवक उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली

 
Top