उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तालुक्यातील ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सातबाऱ्यावर चेअरमनेचच नाव कायम ठेवण्यात यावे, अशी मागणी तेरणा बचाव संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना तेरणानगर लि. ढोकी हा कारखाना सभासदांच्या मालकीचा व सहकारी तत्वावरचा असलेला साखर कारखाना आहे. कारखान्याच्या मालमत्तेवर   (सातबाऱ्यावर) असलेले चेअरमन तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना तेरणानगर लि. ढोकी असे नाव असून यावर अवसायक तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना तेरणानगर लि. ढोकी असे बदल करण्यात येऊ नये. यासंदर्भात तेरणा बचाव संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकारी, तहसिलदार व अवसायक यांची भेट घेण्यात आली. जर यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल केल्यास लोकशाही मार्गाने तेरणा बचाव संघर्ष समितीच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. 

 
Top