उस्मानाबाद/ प्रतिनिधी

उस्मानाबाद जिल्हा परिषदेची ऑनलाईन सर्वसाधरण सभा सोमवार दि. २१ रोजी पार पडली. या ऑनलाईन सर्वसाधारण सभेत  अर्थसंकल्पीय  सभेच्या इतिवृत्तला मान्यता घेण्याची गरज होती. परंतु यामध्ये चर्चा होऊ शकली नाही. यामुळे सत्ताधारी व अधिकाऱ्यांनी हा ठराव गोंधळात अक्षरश वाचून काढला.ऑनलाईन सभेत गांेधळाची स्थिती पाहून जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

 जिल्हा परिषदेची ऑनलाइन सर्वसाधारण सभा सोमवारी पार पडली. कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही सभा ऑनलाइन पद्धतीने झूम अॅपवर घेण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजयकुमार फड यांच्यासह सर्व अधिकारी आणि विषय समित्यांचे सभापती उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्ञानेश्वर गिते यांनी जिल्हा नियोजन समितीच्या विद्युतपंप खरेदीमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप गेला. ५० लाख रुपये खचून गावांमध्ये पुरवण्यासाठी २५ थ्रीफेज व २५ सिंगलफेज विद्युत पंप खरेदी करण्याचा ठराव झाला होता. यासाठी दोन निविदा काढण्यात आल्या. पहिली निविदा कोणतेही कारण नसताना रद्द करण्यात आली. दुसरी काढत असताना कोणतीही मान्यता घेण्यात आली नाही. मात्र, यामध्ये टेंडर मान्य करण्यात आले. विशेष म्हणजे यासाठी पहिल्याच निविदेतील किंमत दाखवण्यात आली. विशेष म्हणजे कोणत्याही गावातून यासाठी मागणी नसताना हा प्रकार करण्यात आला. हा केवळ निधी लाटण्यासाठी प्रकार केल्याचा आरोप गिते यांनी केला. यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. यामध्ये विरोधी सदस्यांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरला, यामुळे गोंधळ उडाला. मात्र, अध्यक्षा कांबळे यांनी यासंदर्भात कारवाई करणार असल्याचे सांगितले. या ऑनलाईन सर्वसाधरण सभेत महिला व बालकल्याण विभागाचे ६० लाख रुपये कपात केल्याबद्दल सक्षणा सलगर यांनी नाराजगी व्यक्त केली. तर हायमस्ट लॅम्प मध्ये ५० टक्क्े कमीशन असल्याचा उल्लेख जि.प.सदस्य महेंद्र धुरगुडे यांनी करून निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप केला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी कांही सदस्य विनाकारण बोलताना सत्ताधाऱ्यांवर टिका करतात हे योग्य नसल्याचे ठणकावून सांगितले. 

 
Top