कळंब / प्रतिनिधी

कॉम्रेड प्रा.अरुण शेळके यांनी विद्यार्थी दशेपासून ते शेवटपर्यंत साम्यवादी विचार अंगीकारून विविध विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून अन्यायास वाचा फोडण्याचे काम केले आहे.त्यांनी केलेले शैक्षणिक कार्य व साम्यवादी विचार तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे भावपूर्ण उदगार प्रा.सुंदरराव गव्हाणे यांनी कॉम्रेड प्रा.अरुण शेळके यांच्या अभिवादन कार्यक्रमात काढले.

  दिनांक २२ जून २०२१ रोजी सावित्रीबाई फुले माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय कळंब येथे कॉम्रेड प्रा.अरुण शेळके यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनी अभिवादन कार्यक्रम रणसम्राट क्रीडा मंडळाचे सचिव ॲड. सी.एन.भवर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

 कार्यक्रमाच्या सुरुवातीस  प्रा.अरुण शेळके यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सा. साक्षी पावनज्योतच्या  विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक के.व्ही.सरवदे, प्राचार्य जयचंद कुपकर,संपादक सुभाष द.घोडके, उमेश मिटकरी,सहशिक्षक जाफर पठाण,उपसंपादक माधवसिंग राजपूत,कार्यकारी संपादक अविनाश घोडके आदींनी प्रा.अरुण शेळके यांच्या कार्यावर आपल्या मनोगतातून प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.काकासाहेब मुंडे यांनी केले.कार्यक्रमास शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

 
Top