तुळजापूर / प्रतिनिधी- 

 शहरात जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करण्यात येत असलेली पाच कोटी रुपयांची विकासकामे दर्जेदार आणि अंदाज पत्रकाप्रमाणे करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

यासंबंधी तुळजापूर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना ४ जून रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पालिकेच्या वतीने शहरात अंतर्गत रस्ते, गटारी, पेव्हर ब्लाॅक बसवणे आदी विविध विकासकामे करण्यात येत आहेत. महाविकास आघाडी सरकारने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दिलेल्या निधीतून करण्यात येत असलेली विकासकामे दर्जेदार व अंदाज पत्रकाप्रमाणे करण्यात यावी. निवेदन देतेवेळी तुळजापूर विधानसभा अध्यक्ष गोकुळ शिंदे, दिलीप मगर, अमर चोपदार, गोरख पवार, सचिन कदम, संदीप गंगणे, महेश चोपदार, नितीन रोचकरी, शशी नवले, जनक पाटील, दिनेश क्षीरसागर आदींची उपस्थिती होती.


 
Top