कोरोणाच्या संकटामुळे 24 जुन 2021 रोजी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश तर्फे आयोजीत ऑनलाईन बैठक जिल्हा भाजपा कार्यालय धाराशिव येथे संपन्न झाली. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर प्रथमच अशा प्रकारे ऑनलाईन प्रदेश कार्यकारीनीची बैठक पार पडली.
या प्रसंगी बैठकीला मुंबई प्रदेश कार्यालयातुन मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, आशिष शेलार, पंकजाताई मुंडे, प्रविण दरेकर, चंद्रशेखर बावनकुळे यांनी मार्गदर्शन केले. प्रदेश कार्यालयात जसे बैठकीचे आयोजन केले जाते तशाच प्रकारे महाराष्ट्रातील सर्व जिल्हयाच्या मुख्य कार्यालयात जिल्हा अध्यक्ष व सर्व अपेक्षीत कार्यकारीनी सदस्यांच्या उपस्थीतीमध्ये ही बैठक संपन्न झाली. ठरल्याप्रमाणे सकाळी 10 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी एन.डी.ए.सरकारची ७ वर्षाच्या कामगीरी बद्दल माहिती दिली. त्यानंतर नियोजीत कार्यक्रमानुसार उदघाटन सत्र दिप प्रज्वलन स्वागत कार्यक्रम, त्यानंतर प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी संपुर्ण कार्यक्रमाचे प्रस्तावित केले.
दुपारी भोजनानंतर पुन्हा बैठकीस सुरुवात झाली. या प्रसंगी दोन प्रस्ताव घेण्यात आले, व आगामी काळातील कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी देवेंद्र फडणवीस यांच्या समारोपिय भाषणा नंतर राष्ट्रगीताने बैठकीचा समारोप करण्यात आला. या प्रसंगी भाजपा जिल्हा कार्यालयात या बैठकीस जिल्हाध्यक्ष नितीन काळे, बुध्दीजीवी प्रकोष्ठचे दत्ताभाऊ कुलकर्णी, प्रदेश कार्यकारीनी सदस्य एड.व्यंकटराव गुंड, प्र.का.स.एड.मिलींद पाटील, प्र.का.स.एड.खंडेराव चौर, प्र.का.स. संताजीराव चालुक्य, प्र.का.स. सुधिर पाटील, प्र.का.स. सतिश दंडनाईक, जिल्हा सरचिटनीस (संघटक) एड.नितीन भोसले, जिल्हा सरचिटनीस प्रदिप शिंदे, जिल्हा सरचिटनीस माधव पवार, तसेच सर्व मंडल अध्यक्ष तुळजापुर संतोष बोबडे, उमरगा कैलास शिंदे, लोहारा राजेंद्र पाटील, कळंब अजीत पिंगळे, परांडा राजकुमार पाटील, धाराशिव शहर राहुल काकडे, तालुका सरचिटनीस (संघटक) नामदेव नाईकल व जिल्हा भरातील सर्व अपेक्षीत मान्यवर मोठया संख्येने पुर्ण वेळ उपस्थीत होते.