परंडा / प्रतिनिधी - 

 वाचन हा माणसाच्या जीवनाचा स्वार्थ आहे जी जी माणसे पुस्तकाच्या सान्नीध्यात राहिली त्यांचा उद्धार झाला  हा इतिहास आहे.वाचन हा माणसाच्या जीवनाचा स्वार्थ आहे असे प्रतिपादन शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे.शिंदे महाविद्यालयात स्वर्गीय पी.एन.पाण्णीकर यांच्या स्मरणार्थ व्यक्तिमत्व विकासात वाचनसंस्कृतीची आवश्यकता या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनार आयोजित करण्यात आले होते.त्यावेळी मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते म्हणून संदीप वाघचौरे यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.दीपा सावळे या उपस्थित होत्या.  महाविद्यालयातील ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ.राहुल देशमुख यांनी या कार्यक्रमाचे संयोजन, सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक केले.तर पाहुण्यांचा पात्र परिचय डॉ.विशाल जाधव यांनी केला.पुढे बोलताना संदीप वाकचौरे म्हणाले की समाजाचा उद्धार करण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल हे महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी संघर्ष केला त्यावेळेस त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातून सांगितले होते.महात्मा फुलेंनी स्वतःच्या पत्नीला शिकविले व मुलींची पहिली शाळा काढली आणि आज या देशांमध्ये अनेक स्त्रिया शिकल्या व मोठमोठ्या पदावर कार्यरत झाल्या आहेत आपण संपू पण पुस्तके संपणार नाहीत पुस्तक आपल्याला उज्वल भविष्य देतात असे प्रमुख वक्ते संदीप वाकचौरे यांनी आपल्या मार्गदर्शन मध्ये सांगितले.

अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्या डॉ.दीपा सावळे म्हणाले की,व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक म्हणजे वाचन आहे आपले पूर्वज काही ना काही तरी वाचन करत होते.त्यांनी आपल्या कल्पना, ज्ञान यांची देवाण-घेवाण पुस्तकातून वाचनाच्या माध्यमातून केली आहे.आपला भारत देश हा अध्ययन करणाऱ्यांचा देश आहे, वाचन संस्कृती परंपरागत आलेली संस्कृती आहे.ही वाचन संस्कृती जपल्या  शिवाय पर्याय नाही. कार्यक्रमाच्या शेवटी प्राध्यापक विद्याधर नरवडे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले या राष्ट्रीय एक दिवशी वेबिनार साठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व राज्यातील अनेक प्राध्यापक सहभागी झाले होते.


 
Top