उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राज्य सरकारने शहरात मंजूर केलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी तातडीने निधी द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी केली. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार शुक्रवारी शहरात आले होते. त्या वेळी त्यांनी अजित पवार यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली. अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिल्याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले. आता हे महाविद्यालय तातडीने सुरु करण्याच्या दृष्टीने सरकारने पुरेसा निधी उपलब्ध कीन देण्याची मागणी त्यांनी केली. या वेळी पवार यांनीही लवकरात लवकर निधी देऊन हे महाविद्यालय सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे आश्वासन दिले.


 
Top