तुळजापूर / प्रतिनिधी-

 लाॅकडाऊनमध्ये शहरात अवैध धंदे फोफावले असून, खुलेआम दारू विक्री सुरू आहे. दरम्यान, उत्पादन शुल्क विभागाने रविवारी (दि.७) पहाटे शहरातील वडारवाडा भागात कारवाई करत एका जीपसह ६०० लिटर हातभट्टीची दारू जप्त केली. परंतु यावेळी आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाल्याने कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शहरात बंद दारू दुकानासमोर दिवसभर खुलेआम दारूची विक्री सुरू आहे. परंतु याकडे पोलिसांसह उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, रविवारी पहाटे उत्पादन शुल्क विभागाने शहरातील वडारवाडा भागात कारवाई करत बोलेरो जीपसह (क्र. एम एच ६ डब्ल्यू ६८३७) हातभट्टीच्या दारूचे ७ ट्यूब (६०० लिटर) ताब्यात घेतले.

लाॅकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार दुपारी ११ नंतर बंद आहेत. मात्र असे असले तरी शहरात दारूची ऑर्डरनुसार होम डिलिव्हरी मिळत आहे. हा सर्व प्रकार उत्पादन शुल्क व पोलिसांच्या आशीर्वादाने बिनबोभाट सुरू असल्याचे समजते.

 
Top