तुळजापूर / प्रतिनिधी-

तालुक्यातील तिर्थब्रुद्रक येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेञस , पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्व्यवसाय तथा क्रिडा व युवक कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य सुनिल केदार यांनी  भेट देवुन पाहणी केली.

यावेळी प्रथमतः डॉ.श्रीकृष्ण ठवरे पशुधन विकास अधिकारी यांनी मा. ना. केदार साहेबांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यानंतर लगेच मा. केदार साहेब मंत्री महोदय याच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण झाल्यानंतर मान्यवरांनी पुशुधनाची व प्रक्षेत्राची पाहणी केली त्यावेळी डॉ. श्रीकृष्ण ठवरे यांनी उस्मानाबादी शेळी बाबत व प्रक्षेत्राची माहिती दिली.

प्रक्षेत्र भेटीच्या वेळी  सुनिल केदार यांच्या सोबत सहआयुक्त पशुंवर्धन लातूर डॉ. चंदेल  , जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त उस्मानाबाद डॉ. पसरटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी उस्मानाबाद डॉ. आघाव, पशुधन विकास अधिकारी प.सं. तुळजापूर डॉ. सादगिरे, पशुधन विकास अधिकारी सावरगाव डॉ. पांगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

 
Top