उस्मानाबाद/ प्रतिनिधी

येथील व्यंकटेश  महाजन वरिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असनाऱ्या शेतकरी मित्र केंद्रास एक वर्ष पूर्ण झाले आहे.हे शेतकरी मित्र केंद्र शिवार फौंडेशन संचालित शिवार संसद युवा चळवळ व व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे केंद्र सुरु आहे. या केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडी –अडचणी सोडविण्याचे तसेच त्यांना सल्ला व मार्गदर्शन करण्याचे काम या माध्यमातून केले जाते.

 या केंद्राच्या माध्यमातून गेल्या वर्षी जून महिण्यात बायर कंपनीच्या बाजरीच्या बियाणाचे मोफत वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले.या संधीचा फायदा अनेक शेतकऱ्यांनी घेतला. याच बरोबर शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज सांगणे,कृषीविषयक सल्ला देणे,कृषी विषयक योजनाची माहिती शेतकऱ्यांना देणे, या सारखे कार्य या केंद्राच्या माध्यमातून केले जाते. या केंद्राच्या माध्यमातून पिक विमा ऑनलाईन पद्धतीने कसा भरावा याचे प्रशिक्षण अनेक शेतकऱ्यांना दिले गेले व याचा फायदा शेतकऱ्यांना झालेला दिसून येतो.शिवार फौंडेशन चे जिल्हा समन्वयक श्री अशोक कदम यांनी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष भेट दिली व त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना योग्य तो सल्ला देण्याचे काम या केंद्राच्या माध्यमातून केले जाते.

 गेल्या वर्षभरात जवळपास १९८२शेतकऱ्यांनीफोन द्वारे संपर्क साधून आपल्या अडचणी सांगितल्या .तसेचजिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी या शेतकरी मित्र केंद्रास प्रत्यक्ष भेट दिली व इथल्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.या केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे समुपदेशन करण्याचे काम केले जाते.पीकविमा ,पीककर्ज, शासकीय योजना या बाबतची माहिती शेतकऱ्यांना वेळोवेळी दिली जाते. ह्या केंद्राचे कार्य वाढविण्यासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सामाजिक शास्त्रे विभाग यांची मदत घेतली जात आहे.

 या केंद्राची स्थापना तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट चे सचिव अॅड. मिलिंद पाटील, डॉ.अभय शहापूरकर, शिवार फौंडेशनचे संस्थापक श्री.विनायक हेगाना यांच्या संकल्पनेतून झाली आहे.आज हे केंद्र महाविद्यालयाच्या अंतर्गत चालविले जाते. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास त्यांनी ८९५५७७१११५ या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन या केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.


 
Top