उस्मानाबाद / प्रतिनिधी-

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायदयानुसार दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना प्रवेशासाठी स्वयंअर्थसहाय्यीत शाळांनी दि. 11 जून 2021 पासून पोर्टलवर प्रवेशासाठी दिनांक देण्यात यावेत व प्रवेशाची कार्यवाही सुरु करावी.आर.टी.ई.अंतर्गत लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेमध्ये जावून आर.टी.ई.,पोर्टलवरील दिनांकानुसार मुळ प्रमाणपत्रे व छायांकीत प्रती घेवून आपल्या पाल्याचा तात्पुरता प्रवेश दि.३० जून २०२१ पर्यंत घ्या.त्यानंतर लॉटरी लागलेल्या कोणत्याही बालकास प्रवेश दिला जाणार नाही. प्रवेश कालावधी संपल्यानंतर रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना नवीन आदेशाप्रमाणे अनुक्रमे प्राधान्य देण्यात येईल.

 कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने पालकांना शाळेत जाऊन प्रवेश घेणे शक्य नसल्यास व्हॉटस्अॅप, ई-मेल व्दारे कागदपत्रे शाळेस पाठवून मुख्याध्यापकाशी भ्रमणध्वव्दारे संपर्क साधून प्रवेश निश्चित करून घ्यावा.असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. अरविंद मोहरे यांनी केले आहे.


 
Top