स्थानीक गुन्हे शाखेच्या टीम ने नऊ जणांना घेतले ताब्यात 

उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्यात पाच ते सातजण एका वाहनातून चोरीसाठी रात्रीची वेळ निवडायचे. कोणालाही वाहनाचा आवाज येऊ नये. यासाठी गोडाऊनपासून अर्धा किलोमीटर अंतरावर वाहन थांबविले जायचे. विशेष म्हणजे पावलांचा आवाज येऊ नये. यासाठी सर्वजण रस्त्याच्या खाली उतरून शेतातून गोडाऊनच्या दिशेने जात असत अशा या टोळीचा  उस्मानाबादच्या स्थानीक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी अखेर पर्दाफाश करुन नऊ जणांना ताब्यात घेतले आहे.

 शेतकऱ्यांच्या शेतमालावर डल्ला मारणारी आठ जणांची टोळी पकडण्यात स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना सोमवारी (दि.१४) यश आले आहे. विशेष म्हणजे यामध्ये दोन व्यापाऱ्यांचेही संगनमत असल्याने त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वर्षभर मेहनत करून शेतकऱ्यांचा   माल लंपास करणाऱ्या टोळीला पकडण्यात यश आल्याने शेतकरी वर्गात समाधान आहे. पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक करन माने, भुजबळ यांच्या टीमने ही कारवाई केली आहे.सोयाबीनचे भाव वाढल्याने त्यालाही सोन्याची झळाळी लागली आहे. या झळाळीवर चोरट्यांची नजर बसली. अन जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यात अनेक ठिकाणी सोयाबीन  चोरीच्या घटना घडल्या. रात्रीच्यावेळी चोरी करण्याची अनोखी पद्धत असल्याने शेतकऱ्यांनी या टोळीची चांगलीच धास्ती घेतली होती.

पाच ते सातजण एका वाहनातून चोरीसाठी रात्रीची वेळ निवडायचे. कोणालाही वाहनाचा आवाज येऊ नये. यासाठी गोडाऊनपासून अर्धा किलोमीटर अंतरावर वाहन थांबविले जायचे. विशेष म्हणजे पावलांचा आवाज येऊ नये. यासाठी सर्वजण रस्त्याच्या खाली उतरून शेतातून गोडाऊनच्या दिशेने जात असत. कानोसो लागण्याच्या आतच १५ ते २० मिनिटांत ४० ते ५० कट्टे गाडीत टाकून तेथून पसार होत असत. सकनेवाडी (ता. उस्मानाबाद) येथील सुर्यातेज, वरुडा (ता. उस्मानाबाद) रस्त्यावरील ओडीएसएफ, येरंडागव (ता. कळंब) येथील शेतकरी, खामगाव (ता. उस्मानाबाद) येथील गणराज्य अॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या  गोडाऊनमधून या टोळीने सोयाबीन, हरभऱ्याचे कट्ट्यावर डल्ला मारला होता. याशिवाय जिल्ह्याच्या इतरही भागात ही टोळी कार्यरत होती. या टोळीतील दादा उद्धव चव्हाण, अनिल उद्धव चव्हाण, युवराज राजाराम काळे, महादेव सुरेश चव्हाण, विकास उद्धव चव्हाण (रा. राजेशनगर पारधी पेढी, ढोकी), आबा आप्पा शिंदे (रा. मोहा, ता. कळंब), अंकुश कल्याण शिंदे (इटकूर, ता. कळंब) यासह  दोन व्यापाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सहा लाख ६० हजार ६०७ रुपयांचा माल जप्त केला आहे.


 
Top