तुळजापूर  / प्रतिनिधी- 

 कोरोना रोखण्यासाठी शहरात आता १५६१३ मंडळीना कोविशिल्ड व कोवँक्सीन लस देण्यात आलेली आहे. यात  ४५ वर्षे वयोगटापुढील  ८० टक्के  मंडळीचे लसीकरण पुर्ण झाले आहे. यात ४५ वयोगटपुढील मंडळींना कोवँक्सीनचे ५६६५ तर कोवँक्सीनचे ७९१० असे एकुण १३५७५ मंडळीचे लसीकरण करण्यात आले आहे. तर कोवँक्सीनच्या १८ ते ४४ वयोगटातील मंडळीना कोविशिल्डच्या १०७२ तर कोवँक्सीनच्या ९७५ लस अशा एकुण  २०४३ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

या लसीकरण मोहीम साठी  उपजिल्हारुग्णालयात दोन केंद्र कार्यरत करण्यात आले आहेत.उपजिल्हारुग्णालयचे वेद्यकीय अधिकारी डाँ. चंचला बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली डाँ.श्रीधर जाधसह ११ जणांचा स्टाँफ  परिश्रम घेत आहेत .

 
Top