उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हा प्रशासनाच्या सतर्कतेमुळे लोहारा तालुक्यातील मार्डी येथे नियोजित बालविवाह दि.15 सोमवारी दोन्ही परिवाराचे समुपदेशन करून रोखण्यात यश मिळाले आहे तर बालविवाहचे दुष्परिणाम पटवून देऊन वयोपूर्तीनंतर विवाह करणार असल्याचे लेखी हमिपत्र पालकांकडून घेण्यात आले.

  याबाबत माहिती अशी की,सोलापूर जिल्ह्यातील जवळपास15 वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीचा उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील मार्डी येथील मुलाशी रचला गेला होता,सदर बालविवाह दि15 सोमवारी सकाळी 9 च्या दरम्यान होणार असल्याची खबर गुप्तबातमीदारामार्फत उस्मानाबाद चाईल्ड लाईन ला एक दिवस आधीच रात्री उशिरा समजली,चाईल्ड लाईन समन्वयक ज्ञानेश्वर गिरी यांनी तत्परतेने उस्मानाबाद जिल्हा बालविवाह प्रतिबंध समिती सदस्य सचिन बिद्री, लोहारा पोलीस ठाणे आणि संबंधीत ग्रामसेवकास याबाबत कल्पना दिली आणि शोधमोहिमेस सुरुवात झाली.15 तारखेच्या पहाटेच उस्मानाबाद हुन चाईल्ड लाईन समन्वयक ज्ञानेश्वर गिरी व सदस्य रवी राज राऊत यांनी गाव गाठले. ग्रामपंचायत कार्यालयात नवरी मुलगी व नवरा मुलगा अश्या दोन्ही परिवाराला एकत्रित बोलावून त्यांना बालविवाह प्रतिबंध कायद्याची सखोल माहिती देत बालविवाहचे दुष्परिणामाची माहिती देऊन लेखिस्वरूपात मुलीचे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर विवाह करणार असल्याचे हमीपत्र घेण्यात आले आणि सदर हमीपत्र व पंचनामा अहवालाची प्रत सोलापूर जिल्हा महिला व बालकल्याण विभागाला पाठविण्यात आले.

यावेळी लोहारा पोलीस निरीक्षक धरमसिंह चव्हाण,लोहारा पंचायत समितीचे सोपान एकेले,लोहारा पोलीस उपनिरीक्षक ए एन वाठोरे,पोलीस नाईक एच एन पापुलवार,सरपंच उशाबाई अशोक पाटील,ग्रामसेवक एफ आय सय्यद बाळविकास पर्यवेक्षिका सौ. जमादार आणि सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब पाटील आदींची उपस्थिती होती.

 
Top