उमरगा/ प्रतिनिधी-

शहरातील कोविड उपजिल्हा रुग्णालय येथे उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन टॅंक उभारणी कामास बुधवारी (१६) जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी भेट देउन पाहणी करून प्रगतीवर असलेल्या प्रकल्पाबद्दल संबंधीत अधिकारी वर्गाला सूचना करत काम वेगाने करण्या च्या सूचना आदेश दिले. 

यावेळी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संजय पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ अशोक बडे, डॉ मुल्ला, डॉ प्रवीण जगताप, डॉ विक्रम आळंगेकर, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे संजय विभूते यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी हा ऑक्सिजन प्रकल्प महत्वाचा असून सदरचा प्रकल्प त्वरित कार्यान्वित करण्यासाठी वेगाने काम करण्याची गरज आहे. यासाठी महसूल आणि बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवा देणाऱ्या परिचारिकांचे कौतुक जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी विशेष कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर म्हणाले की,

उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिका, संपूर्ण कर्मचाऱ्यांनी कोविड काळात उत्तम सेवा करून प्रामाणिकपणे आरोग्य सेवा देवून कर्तव्य बजावल्याबद्दल याबद्दल परिचारिकांचे अभिनंदन करून काही समस्या असल्याची विचारणा केली. यावेळी आरोग्य कर्मचारी यांच्या शासकीय निवासस्थानी अनेक अडचणी असून त्वरित दुरुस्ती व्हावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली. जिल्हाधिकारी यांनी हजर असलेल्या बांधकाम विभागाच्या अभियंताना निवासस्थानी दुरुस्ती व इतर कामे करण्याचे आदेश दिले.


 
Top