कळंब/ प्रतिनिधी- 

पेशंट ठिक होण्यासाठी व त्याचा आजार आटोक्यात आणण्यासाठी डॉक्टर्स मंडळी कसोशीने प्रयत्न करीत असतात. हे काम करत असताना कांही दुर्घटना घडली अथवा पेशंट दगावला तर त्याच्या नातेवाईकां मार्फत डॉक्टर ला/हॉस्पिटल स्टाफला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली जाते. वेळप्रसंगी हॉस्पिटल ची तोडफोड केली जाते. अशा घटनांमुळे आरोग्य सेवा देण्यास अडचणी येत असून डॉक्टर मंडळी अतिशय मानसिक दडपणाखाली काम करत आहेत. याला आळा बसावा म्हणून राज्य सरकारने " डॉक्टर संरक्षण कायदा " लागु केला परंतु त्याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम दिसून आला नाही. उलटपक्षी डॉक्टरां  वरिल हल्ल्याचा प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. 

या व अशा प्रकारच्या समस्यां कडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व केंद्रीय स्तरावर कठोर कायदा लागू करण्यासाठी आय एम ए उद्या दि.१८ जून रोजी देशव्यापी निषेध दिन पाळीत आहे. संपूर्ण देशात चार लाख आय एम ए चे डॉक्टर काळ्या फिती/काळे मास्क /काळे कपडे परिधान करून कोवीड सेवा/कोवीड लसीकरण व अन्य आरोग्य सेवा देणार आहेत. आएएमएच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर रुग्णालये बंद आदींचा आवलंब करावा लागेल असे पत्रकात नमुद करण्यात आले आहे. यावर प्रदेशाध्यक्ष डॉ. रामकृष्ण  लोंढे, कळंब अध्यक्ष डॉ. कमलाकर गायकवाड, सचिव डॉ. सत्य प्रेम वारे, डॉ सुशिल ढेंगळे, डॉ. दिनकर मुळे आदींच्या सह्या आहेत.

 
Top