उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 गंभीर गुन्हयात तुरूंगात असलेल्या आरोपींने कोणाच्या दबावाला बळी पडून अजित पवार यांच्यावर आरोप केलेत हे उघड होत आहे. कारण भाजप कार्यकारणीच्या बैठकीत राज्यातील कोरोना, राज्यातील विकास कामे यावर चर्चा होण्याऐवजी गुन्हेंगारांनी केलेल्या आरोपांवर  चर्चा झाली, अशी खंत राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. 

गुरूवार व शुक्रवार दि. २४ व २५ जून रोजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उस्मानाबाद जिल्हयातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विधानसभेच्या अनुशंगाने आढावा बैठका घेतल्या. जिल्हयातील जलसिचंन योजनेसंदर्भात ही जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी विरोधी पक्षावर जोरदार टिका करत ४० रू. लिटर पेट्रोल असताना जे लोक मोर्चा काढत होते. ते आता गप्प आहेत. डिझेल पेट्रोलच्या वाढीव करातून केंद्र सरकार आपला महसूली खर्च चालवत आहे. तर कोरोनावरील लस देखील त्याच खर्चातून राज्याला दिली जात आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात बोलताना पाटील यांनी केंद्र सरकार ने डाटा न मिळाल्यामुळेच सुप्रीम कोर्टात पुरेशी माहिती देता आली नाही, असे सांगून ओबींसीच्या जनमतांचा आदर करणे आवश्यक आहे, असे सांगितले. 

या पत्रकार परिषदेला राज्यमंत्री संजय बनसोडे, आ.विक्रम काळे, माजी अा.राहुल मोटे, जि.प.चे माजी अध्यक्ष जीवन गोरे, संजय निंबाळकर आदी उपस्थित होते. 

पोट निवडणुका होऊ नये

राज्यात होणाऱ्या पोट निवडणुकीसाठी भाजपने ओबींसीना उमेदवारी देणार असल्याचे जाहीर केले आहे.आपल्या पक्षाची काय भूमिका आहे ? असा प्रश्न विचारला असता जयंत पाटील यांनी पोट निवडणुका होऊच नये, अशा प्रकारची आमची भूमिका असून निवडणुका झाल्या तर आम्ही आमची भूमिका जाहीर करू, असे सांगितले. यावेळी नगर पालिकेने विनापरवाना लावलेले बॅनर काढले. या संदर्भात कांही पत्रकारांनी त्यांच्या नजरेस आणून दिल्यानंतर राष्ट्रवादी व शिवसेनेची आघाडी असली तरी नियमाप्रमाणेच बॅनर लावणे आवश्यक आहे. विना परवानगी आपल्या स्वागताचे लावलेले बॅनर उस्मानाबाद नगर परिषदेने काढल्याबद्दल पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले. 

योग्य पाठपुरावा व्हावा

कृष्णा खोऱ्यातील मराठवाडयाच्या हक्काचे पाणी मिळविण्यासाठी योग्य पाठपुरवा होणे आवश्यक आहे. उपसासिंचन क्र. १ व उपसासिंचन क्र.२ याद्वारे उस्मानाबाद व बीड जिल्हयाला ५.३२ टिएमसी पाणी जून २०२३ पर्यंत उपलब्ध होणार आहे. मध्यतरी या कामाची गती मंदावली होती. बऱ्याच ठिकाणी अर्धवट कामे झाली होती. या मिसींग लिंकमुळे एकत्रच कामाची सुरुवात करणार आहोत, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगून सिना-कोळेगाव ते दुधाळवाडी व घाटने ते रामदरा तलाव, या दोन कामाचे टेडर लवकरच काढण्यात येतील त्यासाठी अधिक्षक अभियंता यांनी  मुंबईला येऊन टेंडर प्रक्रिया करने आवश्यक आहे. या कामासाठी १ हजार ४२ कोटीची मान्यता देण्यात आली आहे. तर दुसऱ्या टप्यासाठी ४७७ कोटीं रुपयांची मान्यता देण्यात आली आहे. हे काम गतीने पुर्ण होण्यासाठी वेळेची मर्यादा ठेवण्यात येणार आहे. ज्या कंपनीला या कामाचे टेंडर मिळेल त्याच कंपनीने ५ पाच वर्ष उपसा सिचंन क्र. १ व उपसा सिचंन क्र.२ या योजनेची देखभाल करण्याचे काम संबंधीत कंपनी ने करने आवश्यक आहे, असे ही जलसंपदा मंत्री पाटील सांगितले.  

 
Top