उस्मानाबाद / प्रतिनिधी-

आंतर-राष्ट्रीय बाल मजुरी विरोधी दिनाच्या निमित्ताने दि. 12 जुन महाराष्ट्र राज्यातुन बाल मजुरी-चे समूळ उचाटन करुन बाल मजुरांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात समाविष्ठ करुन घेणे त्यांचे व आवश्यकता भासल्यास त्यांचे कुटुंबाचे पुर्नवसन करणे, बाल मजुरांची मालकांच्या तावडीतून मुक्तता करण्याच्या उद्देशाने बाल कामगार प्रथेविरुध्द जनजागृती अभियान सरकरी कामगार महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत राबविण्यात येत आहे.

 बाल व किशोर वयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, 1986 नुसार 14 वर्षाखालील बालकांना कोणत्याही व्यवसायात/प्रकियेत कामावर ठेवणे तसेच 14 वर्ष परंतु 18 वर्ष पूर्ण न झालेले किशोर वयीन मुलांना धोकादायक उद्योग व प्रक्रियेमध्ये कामावर ठेवणे गुन्हा आहे.जर मालकाने किंवा नियोक्त्याने बाल अथवा किशोर वयीन मुलांना कामावर ठेवल्यास त्यांस सहा महिने ते दोन वर्षापर्यंत कारावास किंवा 20 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.

 उस्मानाबाद जिल्हातील तमाम नागरिक / व्यापरी / उद्द्योजक यांनी बाल कामगार कामावर ठेवू नयेत. तसेच कोणी बाल ठेवल्याचे आढळून आल्यास नजिकच्या कामगार कार्यालयाशी संपर्क साधावा.असे आवाहन येथील सरकारी कामगार अधिकाऱ्यांनी केले आहे.                                                                  


 
Top