उमरगा / प्रतिनिधी-

राज्यातील होमगार्ड समस्या/मागण्या घेऊन बसव प्रतिष्ठाणचे अध्यक्ष तथा समाजसेवक रामलिंग पुराणे गेल्या दोन वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत. बुधवारी (दि.८) राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व्हीसी बैठक संपन्न झाली आणि प्रलंबित ११ मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊन मंजुरीबाबत सूचना देण्यात आल्या.

 राज्यातील होमगार्ड समस्या/मागण्या घेऊन बसव प्रतिष्ठाणचे अध्यक्ष तथा समाजसेवक रामलिंग पुराणे बसव प्रतिष्ठाणच्या वतीने ११ मागण्या घेऊन सरकार दरबारी पाठपुरावा चालू होते. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत प्रधान सचिव (विशेष) संजय सक्सेना, उपमहासमादेशक प्रशांत बोराडे, बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष रामलिंग पुराणे, समिती सदस्य उदय पाटील उपस्थित होते. यावेळी बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष रामलिंग पुराणे यांनी ११ मागणीचे सविस्तरपणे माहिती दिली. बैठकीस गृहविभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना, होमगार्ड उपमहासमादेशक प्रशांत बोराडे, बसव प्रतिष्ठाण होमगार्ड न्याय हक्क समिती सदस्य उदय पाटील उपस्थित होते. राज्यातील अपात्र होमगार्ड बरोबरच त्यांना ३६५ दिवस काम आणि विमा विषय महत्वाचा होता, तूर्तास १८० दिवस कामावर शिक्का मोर्तब  झाला आह हा राज्यातील होमगार्डना दिलासा मिळणारा निर्णय घेण्यात आल. व उर्वरित मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊन मंजुरीबाबत सूचना देण्यात आल्या.


 
Top