उमरगा / प्रतिनिधी-

उमरगा शहरातील पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस वसाहतीमध्ये बुधवारी (दि.९) राज्याचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव, शांतिदूत परिवाराच्या राष्ट्रीय अध्यक्ष सौ. विद्याताई जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले, पोलीस निरीक्षक मुकुंद अघाव यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

 यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, शांतिदूत परिवारचे प्रदेश सरचिटणीस प्रा. युसूफ मुल्ला, मराठवाडा अध्यक्ष प्रा.जीवन जाधव उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पोलीस नाईक नागेश गरूड, शीतल गरूड, सोमनाथ ढोले, माऊली डिगुळे, हभप बाळू मोरे, गरुडझेप फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गणेश गरूड, रफिक शेख, लक्ष्मण मिसाळ यांना महाराष्ट्र शांतिदूत सेवारत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. 

 
Top