उस्मानाबाद/ प्रतिनिधी

भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने 25 जुन 1975 आणि आणिबाणी काळातील घटनांना उजाळा दिला जाणार आहे. याबाबत भाजपाचे प्रदेश सचिव अरूण पाठक यांच्या मार्गदर्शनाखालील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी भाजपा जिलाध्यक्ष नितीन काळे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष राजिसंह राजेनिंबाळकर व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

  25 जुन 1975 रोजी या देशातील लोकशाहीचा गळा घोटून सर्व देश बंदिस्त केला गेला,सरकारला विरोध करणाऱ्या राजकीय नेते, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, संघटनाचे पदाधिकारी यांना रातोरात बंदिस्त करून कारागृहात डाम्बण्यात आले हा काळाकुट्ट दिवस भारतीय इतिहासात राष्ट्रीय आणीबाणी म्हणून कुप्रसिद्ध झाला,राजकीय विरोधकांवर क्रूर अत्याचार केले, लाखोंच्या संख्येने नागरिकांना याची झळ बसली,केवळ स्वतःच्या सत्तेला धोका होईल या अनामिक भीतीने हे पर्व घडवले गेले, आजच्या पिढीला आणीबाणीविषयक काही झळ पोहचलेली नसली तरी त्याकाळी समाजाने याचा मोठा त्रास भोगला,याबाबत माहिती देण्यासाठी तसेच ज्या राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी यात हाल अपेष्टा सहन केल्या त्यांच्याप्रती सहवेदना प्रकट करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने माहितीपर कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.   आणीबाणी विषयक कार्यक्रमात झूम मिटिंग द्वारे माहिती,ऑनलाईन व्याख्यान ,आणीबाणीत कारागृहात शिक्षा भोगलेल्या योध्यांचा सन्मान करण्यात येईल. 

ही भाजपा युवा मोर्चाची महत्त्व पूर्ण बैठक प्रतिष्ठान भवन भाजप कार्यालय उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आली होती.या बैठकीस भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव व जिल्हा प्रभारी, अरुण पाठक, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे ,भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांनी हा कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यातील नव युवकां पर्यंत पोहचवण्याचा मानस प्रस्तावनेपर भाषणात व्यक्त केला. या बैठकीत अरुण पाठक यांनी पक्ष वाढीसाठी काम करत राहण्याचे आवाहन केले तसेच पुढील नियोजित कार्यक्रम आणि तसेच नियोजित कार्यक्रमाची माहिती दिली ,

 याप्रसंगी, बैठकीला विनायक कुलकर्णी,तालुकाध्यक्ष अनिल पाटील ,गणेश देशमुख ,ओम नाईकवाडी,आत्मनिर्भर संयोजक सचिन लोंढे ,प्रीतम मुंडे , बालाजी जाधव ,कुलदीप भोसले ,संदीप इंगळे , गिरीश पानसरे ,सुधीर बिक्कड ,सुजित साळुंके ,सुरज शेरकर ,बालाजी मडके ,प्रसाद मुंडे,गणेश एडके ,रियाज पठाण ,प्रसाद भूमकर ,गणेश जावळे ,नरसिंग लोमटे ,व भाजपा युवा मोर्चाचे जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 
Top