उमरगा / प्रतिनिधी 

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उमरगा पोलीस स्थानिक मधील मैदानात योग दिवस साजरा करण्यात आला. यात  अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभागी होत विविध प्रकारची योगासने करून योगाभ्यास केला.

 पोलीस स्थानिक मधील मैदानात मंगळवारी (दि.२२) सकाळी ६.३० वाजता  योग शिबिराचे सुरुवात करण्यात आले आहे. यात पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव सह इतर  अधिकारी-कर्मचाऱ्यांनी योगाभ्यास करताना विविध योगासनांचे धडे गिरविले.दीड तासभर चाललेल्या या शिबिरात योगगुरू सुरेंद्र वाले यांनी विविध आसने व प्राणायम योग करून दाखविले. दीड तासभर चाललेल्या या शिबिरात योगगुरू सुरेंद्र वाले यांनी विविध आसने व प्राणायम योग करून दाखविले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षित अंतर राखून वर्ग घेण्यात आला.आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने पुढील आठवडा भर नियमित योगा चालणार आहे.

 
Top