उस्मानाबाद/ प्रतिनिधी

भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरीकाला समान हक्क व समान संधी असा मूलभूत हक्क दिलेला आहे. त्याअंतर्गत समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होऊन न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी तुळजापूर तालुक्यात तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन समिती गठीत करण्यात आलेली आहे.

 तालुकास्तरावर महिला लोकशाही दिन दर महिन्याच्या चौथ्या सोमवारी सकाळी 11:00 वाजता तहसीलदार तुळजापूर यांचे दालनात आयोजित करण्यात येतो. तालुका महिला लोकशाही दिनात महिलांचे निवेदनातक्रार वैयक्तिक स्वरुपाचे अर्ज सादर करण्यातयावेत.तर न्याय प्रविष्ठ प्रकरणे, आस्थापना सेवाविषयक बाबी यासंबधित अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

 अर्जाचा नमुना बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवायोजना ग्रामीण प्रकल्प तुळजापूर, जुना सरकारी दवाखाना मंगळवार पेठ तुळजापूर येथे विनामूल्य उपलब्ध आहे. करिता तुळजापूर तालुक्यातील ज्या महिलांचे तक्रारी/आडअडचणी असतील त्यांनी अर्ज सादर करावेत असे आवाहन सचिव तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन तालुका तुळजापूर तथा बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीकांत ज्ञा. हावळे तुळजापूर यांनी केले आहे. सदर दिनात महिलांचे तक्रार व निवेदने यावर संबंधित विभागाकडून कार्यवाही करण्यात येते.


 
Top