लोहारा/प्रतिनिधी

छत्रपती कामगार संघटनेच्या वतीने लोहारा तालुक्यातील माकणी येथे बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी व त्यांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी पाच, पाच, कामगाराचे ग्रुप करून कोरोणाचे नियम व जमावबंदीचे आदेश पाळुन दि.8 जुन 2021 रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. य

ावेळी गटविकास अधिकारी सोपान अकेले, सहायक गटविकास अधिकारी संजय ढाकणे, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा माकणी गावचे सरपंच विठ्ठल साठे, उपसरपंच वामन भोरे, ग्रामसेवक एम.टी.जगताप, तंटामुक्त अध्यक्ष पंडीत ढोणे यांनी बांधकाम कामगार व ईतर कामगार यांना 90 दिवस काम केल्याचे प्रमाण पत्र देण्याचे कबुल करून प्रमाणपत्र देण्याचे मान्य केल्यामुळे संघटनेचे धरणे आंदोलन मागे घेण्यात आले. लोहारा तालुक्यातील जेवळी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करायचे ठरले होते. परंतु येथील उपसरपंच मल्लीनाथ डिगे व ग्रामसेवक बिराजदार यांनी लेखी आश्वासन दिल्यामुळे येथील आंदोलन दि.7 जुन 2021 रोजी रद्द करण्यात आले. तसेच दोन्ही गावच्या मान्यवरांचे संघटना अध्यक्ष तानाजी गायकवाड यांनी आभार मानले. 

यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तानाजी गायकवाड, उपाध्यक्ष बालाजी माटे, महासचिव तिम्मा माने, ग्रामीण समाज सुधारक मंडळ संस्था अध्यक्ष अभय कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय शेवाळे, उमरगा लोहारा विधानसभा महासचिव बालाजी चव्हाण, उस्मानाबाद लातूर संपर्क प्रमुख अभिमन्यु कुसळकर, लोहारा तालुकाध्यक्ष संजय दंडगुले, कार्याध्यक्ष दिपक तावडे, तालुका प्रभारी किशोर गायकवाड, उमरगा तालुकाध्यक्ष राम कांबळे, लोहारा तालुका माजी अध्यक्ष महादेव वाघमारे, सास्तुर विभाग प्रमुख दयानंद खरोसे, जनसेवक सुधीर सुरवसे, संघटना आँफीस बाँय बालाजी सुरवसे, शिवाजी सगर, करजगाव शाखा अध्यक्ष गोवर्धन पाटील, शंकर दंडगुले, आविनाश कांबळे, यांच्यासह सर्व माकणी गावचे कामगार उपस्थित होते.


 
Top