तुळजापूर / प्रतिनिधी-

तुळजापूर भारतीय जनता पार्टी उस्मानाबादच्या वतीने तुळजापुर शहर व तालुक्यासाठी ऑक्सीजन कॉन्स्ट्रेटरची बँक सुरु करण्यात आली. यामुळे ऑक्सीजन अभावी होणारी रुग्णांची गैरसोय थांबणार आहे.

 कोरोना आजारातुन बरे झालेले व घरी उपचार घेत असलेल्या रुग्णांना ऑक्सीजनची गरज असल्यास त्यांना नाममात्र  डिपाँझिट व भाडे घेऊन उपचार होई पर्यंत ऑक्सीजन कॉन्स्ट्रेटर उपलब्ध असणार आहे.

 तुळजापुर शहर व तालुक्यासाठी याची सुरवात आमदार राणाजगजितसिंहजी पाटील यांच्या उपस्थित करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष श्री सचिन रोचकरी, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष श्री नितिन काळे, जेष्ठ नेते सुरेश  देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष  विक्रम देशमुख, रुग्ण कल्याण समिति सदस्य  आनंद कंदले,  राहुल साठे, दिनेश बागल व सहकारी उपस्थित होते. कॉन्स्ट्रेटर मिळण्यासाठी आनंद कंदले,  सचिन जाधव यांच्याशी संपर्क  साधण्याचे आवाहन भाजपाने केले आहे.


 
Top