राज्यव्यापी “चक्का जाम” आंदोलनाची ठरविणार रणनिती !

उस्मानाबाद / प्रतिनिधी-

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी भाजपच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात २६ जून रोजी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाची रणनिती ठरविण्यासाठी भाजपच्या महाराष्ट्र ओबीसी मार्चाचे प्रदेशाध्यक्ष्‍ तथा माजी आमदार योगेश ‍टिळेकर सोमवार दि. 21 रोजी उस्मानाबाद दौर्‍यावर असून त्यांच्या उपस्थितीत उद्या उस्मानाबाद जिल्हा  मध्ये भाजप जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. त्यामुळे सरकारच्या विरोधात भाजपच्या वतीने येत्या २६ जून रोजी राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ओबीसी नेते वेगवेगळ्या जिल्हयाचा दौरा करत असून त्यानुसार  भाजपच्या महाराष्ट्र ओबीसी मार्चाचे प्रदेशाध्यक्ष्‍ तथा माजी आमदार योगेश ‍टिळेकर उद्या 21 तारखेला उसमानाबाद जिल्हा  दौर्‍यावर येत आहेत. उद्या त्यांच्या उपस्थितीत उस्मानाबाद जिल्हायात भाजप जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहेत.  उस्मानाबाद जिल्हयाची बैठक उद्या दुपारी 4.00 वा. भाजपा कार्यालय प्रतिष्‍ठान भवन उस्मानाबाद येथे आहे. या बैठकीसाठी आ.राणा जगजितसिंह पाटील, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष नितीन काळे, ओबीसी मोर्चाचे प्रभारी देविदास काळे हे उपस्थित राहणार आहेत. या बैठकी दरम्यान योगेश ‍टिळेकर ओबीसी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची देखील भेट घेऊन चर्चा करणार आहेत. बैठकीपुर्वी ते पत्रकारांशी संवाद साधनार आहेत. या बैठकी साठी जिल्हा पदाधिकारी, आमदार (सर्व लोकप्रतिनिधी), जिल्हा व मंडलाचे अध्यक्ष तसेच ओबीसी मोर्चाचे जिल्हा व मंडलाचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी जिल्हा उस्मानाबाद यांनी केले आहे.

 
Top