परंडा /प्रतिनिधी : - 

जामखेड जि. अहमदनगर  येथील रायगड संस्थानच्या वतीने आयोजित वढू आळंदी ते किल्ले रायगड पालखी सोहळा समितीच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी  अनाळा ता. परंडा येथील सिमरन गोकुळ जाधव यांची निवड दि. १७ रोजी करण्यात आली. संस्थानचे संस्थापक अध्यक्ष शिवशाहीर आकाश भोंडवे - पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. रायगड संस्थान जामखेड यांच्या वतीने संभाजी महाराज यांची समाधी असलेेल्या वढू आळंदीपासून किल्ले रायगड पालखी सोहळा आयोजीत करण्यात आला आहे. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.


 
Top