कळंब / प्रतिनिधी-

मार्केट यार्डमध्ये शनिवारी पहाटे एका आडत दुकानावरील वॉचमनचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला अवघ्या 36 तासात 2 आरोपींचे मुसक्या आवळण्यात यश आले आहे. खुनाचे कारण पण समोर आले असून अजून नऊ जंनाचा तपास चालू आहे 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कळंब येथील एका आडत दुकानासमोर रखवालदार मछिंद्र छगन माने, वय 45 वर्षे, रा. फरीदनगर, कळंब हे दि. 05 जून रोजी 02.04 वाजले च्या सुमारास पहारा देत झोपले असतांना अज्ञात पुरुषाने मछिंद्र माने यांना मारहाण करुन पिस्तुलने गोळी झाडून त्यांचा खून केला होता. हा प्रकार त्या आडत दुकानाच्या सीसीटीव्हीत धुसर स्वरुपात कैद झाला होता. स्थानिक गुन्हे शाखा  च्या पोलीस निरिक्षक गजानन घाडगे, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग माने, सदानंद भुजबळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल काझी, पोलीस  अमोल चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल बबन जाधवर, अविनाश मारलापल्ले, अशोक ढगारे, पांडुरंग सावंत यांच्या पथकाने हे सीसीटीव्ही छायाचित्रण पुन:पुन्हा पाहुन मारेकऱ्याच्या शरिरयष्टीवरुन तपासाची दिशा निश्चित केली. एकंदरीत तपासा दरम्यान हा गुन्हा 1)शाम राजाभाऊ पवार उर्फ बॉयलर, वय 23 वर्षे, रा. केज 2)गणेश सुबराव पवार, वय 19 वर्षे, रा. पारधी पिढी, कळंब यांनी केला असल्याचे निदर्शनास आले. यावर पथकाने त्या दोघांना 06 जून रोजी म्हणजे खूनानंतर अवघ्या 36 तासांत दोन वेगवेगळ्या ठिकाणांहुन जेरबंद केले असून पुढील तपास कळंब पोलीस ठाण्याचे सपोनि अशोक पवार हे करत आहे.या  दोन्ही आरोपींनी पोलीस कस्टडीत खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती मिळतेय. एकूण 11 जणांचा लुटीचा प्लॅन होता. यातील काहीजण यार्डातचं हमाली करत होते. गुन्हा घडवून आणण्यापूर्वी त्यांनी मार्केट यार्डच्या परिसरातचं पार्टी केली, त्यात गांजा आणि दारूचे सेवन करण्यात आले. तिथेच आडत दुकानात शिरून रोकड लुटण्याचा बेत सांगितलं गेला. त्यापैकी एकाकडे गावठी बंदूक होती. ठरल्याप्रमाणे त्यांच्यापैकी एका बंदूकधारीने आतमध्ये प्रवेश केलादरम्यान वॉचमन असलेल्या मचिंद्र माने यांनी त्याला विरोध केला, त्यांच्यात झटापट झाली आणि त्या आरोपीने आपल्याकडे असलेल्या गावठी बंदुकीने गोळी झाडली आणि फरार झाला. छातीवर गोळी लागल्याने रक्तस्त्राव झाला आणि जागीच माने यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर 11 ही जण तेथून फरार झाले. पोलिसांनी अतिशय शिताफीने त्यापैकी दोघांना बेड्या ठोकण्यात यश मिळवले. इतर 9 जणांचा पोलीस शोध घेत आहेत, ज्यामध्ये गोळी मारणाऱ्याचा देखील समावेश आहे


 
Top